M.P.S.C. (P.S.I.) परीक्षेची संपूर्ण माहिती
M.P.S.C. (P.S.I.) परीक्षेची संपूर्ण माहिती :- MPSC (PSI) Information in Marathi
M.P.S.C. (P.S.I.) परीक्षेची संपूर्ण माहिती – MPSC (PSI) Information in Marathi
MPSC (PSI) Information in Marathi पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर पुष्कळ विद्यार्थी हे विविध नोकऱ्यांच्या शोधात असतात. यांपैकी बहुतेक विद्यार्थी हे शासकीय स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करू इच्छितात. नोकरीसाठी अर्ज भरतात, परीक्षा पण देतात. परंतु खूप जण दुर्भाग्याने कमी पडतात. असे का बरं होत असेल. याचे एक मुख्य कारण म्हणजे परीक्षेबद्दलची अपूर्ण माहिती. अर्ज करायचा म्हणून करायचा असं करून चालत नाही. आपण ज्या परीक्षेसाठी अर्ज करत आहे, ज्या पदासाठी अर्ज करत आहे त्याबद्दल संपूर्ण माहिती आपल्याला माहित हवी. हाच विषय घेउन आज आम्ही आलो आहोत. आम्ही आज आपल्याला MPSC – PSI (पोलीस उप-निरीक्षक) परीक्षेबद्दल महत्वपूर्ण माहिती देणार आहोत. तसेच परीक्षेचे स्वरूप, विषय, अभ्यास कसा करावा व पुस्तके कोणती वापरावी या बद्दल मार्गदर्शन करणार आहोत. MPSC (PSI) काय आहे – What is MPSC (PSI)मित्रांनो MPSC (महाराष्ट्र लोकसेवा आयोग) हि एक संस्था आहे जी महाराष्ट्र शासना अंतर्गत कार्य करते. विविध स्पर्धा परीक्षेंचे आयोजन करून शासकीय अधिकाऱ्यांची निवड करणे हे MPSC चे मुख्य कार्य आहे. ह्या परीक्षा वेगवेगळ्या पदांकरिता आयोजित करण्यात येत असते. यातील काही पदे ही वर्ग १, वर्ग २ अधिकाऱ्यांसाठी तर काही पदे हि विविध विभागांतील अधिकारी पदांच्या भरतीसाठी आयोजित केली जाते. यातीलाच एक महत्वाची परीक्षा म्हणजे पोलीस उप-निरीक्षक (PSI) पदासाठीची परीक्षा. जे तरुण PSI साठी तयारी करत आहेत अशा सर्वांना या माहितीचा खूप फायदा होणार आहे. PSI हे MPSC मधील वर्ग २ चे पद आहे. ह्या पदासाठी पात्र होण्यासाठी आपणाला
हे आणि या सारख्या आणखी प्रश्नांची उत्तरे आज आपण जाणून घेणार आहोत. MPSC (PSI) पदासाठी लागणारी पात्रता – MPSC (PSI) Eligibilityही परीक्षा महिला व पुरुष दोन्ही देऊ शकतात. फक्त त्यांनी खालील काही अटींची पूर्तता करावी.
सूट : शासनाने वेळो वेळी जाहीर केलेल्या निर्देशांनुसार वायोमर्यादेमध्ये व जातीनुसार सूट देण्यात आली आहे. * दिव्यांग उमेदवार या परीक्षेसाठी पात्र ठरू शकत नाहीत. MPSC (PSI) परीक्षेचे स्वरूप कसे असते : MPSC PSI Exam Patternही परीक्षा मुख्यत्वे तीन टप्प्यांमध्ये घेण्यात येते.
इ. घटक असतात. ही परीक्षा एकूण २०० गुणांसाठी असते. MPSC (PSI) परीक्षेचा अभ्यासक्रम काय असतो – MPSC PSI Exam Syllabusपरीक्षेचा अभ्यासक्रम हा सर्वसमावेशक प्रकारचा आहे. ज्यामध्ये :
अशा प्रकारचा सर्व समावेशक अभ्यास आपल्याला करावा लागेल. MPSC (PSI) जाहिरातीबद्दल कुठे माहिती मिळणार – MPSC PSI Advertisementशासनाच्या वेबसाईट वर (mahampsc.mahaonline.gov.in) आपण बघू शकता. शिवाय दैनिक वृत्तपत्रांमध्ये सुद्धा या पदाच्या जाहिराती आपल्याला बघायला मिळू शकतात. MPSC (PSI) परीक्षेची तयारी कशी करावी – How to Prepare for MPSC PSI Examमित्रांनो हि परीक्षा जर आपल्याला पास करायची असेल तर सर्वात महत्वाची गोष्ट आहे कठोर परिश्रम घेण्याची तयारी. जर मनाशी ठरवलं तर कोणतीही गोष्ट कठीण नसते हे आपणा सर्वांना माहिती आहे. सुरुवातीला शासनाचे ५ वी ते १२ वी ची पुस्तके आपण वाचू शकतो. तसेच मी खाली काही पुस्तकांची यादी दिली आहे त्यातून सुद्धा आपण अभ्यास करू शकतो. अभ्यास सुरु करण्यापूर्वी परीक्षेची स्वरूप जाणून घ्यावे. पूर्वीच्या प्रश्नपत्रिका काढाव्यात. त्यातील प्रश्नांचे स्वरूप बघा. त्यानुसार त्या विषयाचा अभ्यास करा. इंटरनेटवर सुद्धा या बद्दल खूप वीडीओ पाहू शकतो. त्यानुसार स्वतःच्या नोट्स तयार करून आपण याचा योग्य प्रकारे अभ्यास करू शकतो. MPSC (PSI) परीक्षेसाठी कोणती पुस्तके वापरावे – Books for MPSC PSI Examमित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या कि, या परीक्षेसाठी ठराविक असे कुठलेही पुस्तक नाही. एका पेक्षा जास्त पुस्तक वापरून किवा ऑनलाईन अभ्यासातून तुम्हाला स्वतःच्या नोट्स तयार कराव्या लागणार. तसेच आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे जी माहिती आपण वाचणार आहोत ती बरोबर आहे कि नाही हे सुद्धा तुम्हाला तपासून पाहावे लागणार आहे. काही महत्वाची पुस्तके : Some Suggested Books
इ. आणि असे काही पुस्तके आपण वापरू शकतो. MPSC (PSI) परीक्षेसाठी काही महत्वाच्या टिप्स – Important Tips for MPSC PSI Exam
निष्कर्ष : Conclusionमित्रांनो शेवटी मी तुम्हाला इतकेच सांगू इच्छितो कि जरी परीक्षेचा अभ्यासक्रम खूप मोठा असला तरी तो आपण व्यवस्थित प्रकारे अभ्यास करून पूर्ण करू शकतो. तर मग वाट कसली बघता चला लागा तयारीला. ALL THE BEST…………. M.P.S.C. (P.S.I.) परीक्षेबद्दल नेहमी विचारले जाणारी प्रश्ने – FAQs about M.P.S.C. (P.S.I.)१. बाहेरील राज्यातील रहिवासी विद्यार्थी एम. पी. एस. सी. परीक्षा देऊ शकतात का ? उत्तर : नाही. ज्या विद्यार्थ्यांकडे महाराष्ट्राचे रहिवासी प्रमाणपत्र (Domicile Certificate) आहे फक्त तेच विद्यार्थी परीक्षा देऊ शकतात. २. पी. एस. आय. (P.S.I.) हे कोणत्या वर्गाचे पद आहे ? उत्तर : पी. एस. आय. हे वर्ग २ अधिकारी चे पद आहे. ३. पी. एस. आय. (P.S.I.) पदासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे ? उत्तर : किमान पदवी किंवा समतुल्य परीक्षा उत्तीर्ण. ४. पी. एस. आय. (P.S.I.) (महिला) करिता उंची किती असावी लागते? उत्तर : १५७ सेमी. ५. राजपत्रित अधिकारी (Gazetted Officer) म्हणजे काय ? उत्तर : राजपत्रित अधिकारी (Gazetted Officer) म्हणजे असे अधिकारी ज्यांना देशाचे राष्ट्रपती किंवा राज्याचे राज्यपाल यांच्या कडून अधिकृत शिक्का (Stamp) देण्याचे अधिकार प्राप्त असतात. ६. पी. एस. आय. (P.S.I.) हे राजपत्रित अधिकारी पद आहे का ? उत्तर : नाही. ७. MPSC मार्फत आणखी कोणत्या परीक्षा घेण्यात येतात ? उत्तर : MPSC मार्फत विविध परीक्षांचे आयोजन केले जाते ज्यामध्ये राज्यसेवा, विक्री कर निरीक्षक, उप जिल्हाधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक, तहसीलदार, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, गटविकास अधिकारी, नायब तहसीलदार, सहायक विक्रीकर आयुक्त अशा अनेक पदांसाठी परीक्षा आयोजित केली जाते. |
Comments
Post a Comment