शिवनेरी किल्ल्याची माहिती | Shivneri Fort Information In Marathi

 Shivneri Fort information in Marathi – शिवनेरी किल्ला हा महत्त्वपूर्ण ऐतिहासिक किल्ल्यांपैकी एक आहे. शिवनेरी किल्ल्याचा संक्षिप्त इतिहास आपण या लेखातून जाणून घेणार आहोत. शहाजी महाराजांच्या पत्नी जिजाबाई या गरोदर असताना त्यांच्या सुरक्षिततेसाठी त्यांना शिवनेरी किल्ल्यावर ठेवण्यात आले होते.

शिवनेरी किल्ल्याची माहिती | Shivneri Fort Information In Marathi


Shivneri Fort Information In Marathi


19 फेब्रुवारी 1630 रोजी या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. त्यामुळे हा किल्ला खूप प्रसिद्ध आहे. जुन्नर परिसरातील शिवनेरी हा किल्ला इतर डोंगरी किल्ल्यांपेक्षा सर्वात मोठा किल्ला आहे. जुन्नर मधून शिवनेरी किल्ला पर्यंतच्या वाटेवरून किल्ल्याचा तट आणि किल्ल्यातील पूर्वेकडील बौद्ध लेणी इत्यादीचे दर्शन होते. जुन्नर परिसरातील डोंगरी किल्ल्यांपैकी शिवनेरी किल्ला महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये व इतिहास अभ्यासकांना परिचित आहे.

शिवनेरी किल्ल्यावर श्री शिवाजी देवीचे मंदिर आहे शिवाई देवी जुन्नर परिसरातील आदिवासी कोळी बांधवांची कुलदेवता आहे शिवाई देवीच्या नावावरूनच किल्ल्यात शिवनेरी नाव पडले अशी लोककथा जुन्नर परिसरामध्ये रूढ झाली आहे शिवनेरी किल्ल्याचे वर्णन जुन्नर चा किल्ला किंवा जुन्नर चा गड असेही केले जाते.

विजयनगरचा सम्राट कृष्णदेवराय यांच्या आश्रयाखाली असलेल्या लक्ष्मीधर यांनी लिहिलेल्या देव विलास या ग्रंथामध्ये डोंगरी किल्ला कसा असावा याचे निकष दिले आहेत. डोंगरी किल्ल्यांना चहूबाजूने वर चढण्यास कठीण असा नैसर्गिक भाग हवा असतो. सह्याद्रीच्या पर्वतरांगामुळे शिवनेरीला अशी नैसर्गिक

 रचना लाभली आहे. “Shivneri Fort information in Marathi”

शिवनेरी किल्ल्याची माहितीशिवनेरीचा ‘किल्ला’ म्हणून वापर यादव काळापासून सुरू आहे, असे असले तरी सर्वच किल्ला एकाच राजवंशाच्या कालावधीत बांधला असे नव्हे. सातवाहन कालखंडामध्ये बौद्ध लेणी, शिलाहार राजवटीमध्ये तटबंदी, यादव कालखंडात काही ठिकाणची तटबंदी, बुरुज व प्रवेशद्वारांची बांधकामे झाले आहेत. किल्ल्यावरील अंबर खाण्याची इमारत बहमनी राजवटीमध्ये मलिक-उल-तुजार ने बांधली आहे. त्याचबरोबर किल्ल्यावरील इतरही इमारती बांधल्याचे उल्लेख आहेत.                                                                                                       सातवाहन काळात शिवनेरी हा किल्ला म्हणून प्रसिद्ध नसला तरी शिवनेरीच्या कडे कपारी मध्ये सातवाहनांनी बौद्ध भिक्खूंच्या वास्तव्यासाठी लेणी कोरविली. डोंगर रांगांनी वेढलेल्या उंच टेकडीवर असणाऱ्या शिवनेरी किल्ल्याचा सातवाहन, अभीर, सिंद, शिलाहार, यादव, बहमनी, अहमदनगरची निजामशाही, मुघल, मराठे आणि इंग्रज इत्यादी राजवटी शी संबंध आला. [Shivneri Fort information in Marathi]

Shivneri Fort Information


शिवनेरीचा ‘किल्ला‘ म्हणून वापर यादव काळात सुरू झाला. यादव कालखंड ते पेशवे काळापर्यंत विविध राजवटींच्या स्थापत्यशास्त्राची विविधता किल्ल्याच्या बांधकामामध्ये आहे. किल्ल्यावर जाण्यासाठी सात दरवाजे आहेत त्यांच्या बांधकामातही एक सारखेपणा नाही. Shivneri Fort information in Marathi

ते दरवाजे पुढील प्रमाणे आहेत :

  1.  1) महादरवाजा
  2. 2) परवानगी दरवाजा
  3. 3) हत्ती दरवाजा
  4. 4) पीर दरवाजा
  5. 5) शिवाबाई दरवाजा
  6. 6) फाटक दरवाजा
  7. 7) कुलापकर दरवाजा Shivneri Fort information in Marathi

किल्ल्यावर जाण्यासाठी तीन मार्ग

शिवनेरी किल्ल्यावर जाण्यासाठी तीन मार्ग आहेत ते पुढील प्रमाणे आहेत :-

  1. 1)  किल्ल्याच्या दक्षिणेकडून कुसूर गावाजवळून जाणारा मोठा शासकीय मार्ग. या मार्गाने आपण आपले स्वतःचे वाहन किल्ल्याच्या पहिल्या प्रवेशद्वाराच्या पायऱ्यांपर्यंत नेऊ शकतो. तिथून मात्र किल्ल्याच्या दरवाजांमधून पायी चालून गेल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थान व बालेकिल्ला या ठिकाणापर्यंत पोहोचता येते.
  2. 2)  शिवनेरी किल्ल्यावर चढून जाण्याचा दुसरा मार्ग ही चोरवाट आहे. किल्ल्याच्या बालेकिल्ल्यापासून या मार्गाने बौद्ध लेण्यांजवळून दगडी पायऱ्या व साखळदंडाच्या साह्याने चढउताराची वाट आहे मात्र ही वाट अत्यंत धोकादायक असल्याने तिचा वापर केला जात नाही.
  3. 3) शिवनेरी किल्ल्यावर जाणारी तिसरी वाट किल्ल्याच्या पश्चिम बाजूस आहे. ही वाट सध्या वापरात नाही. {Shivneri Fort information in Marathi}

शिवनेरी किल्ल्यावरील प्रसिद्ध ठिकाणे

शिवनेरी किल्ल्यावर पुढीलप्रमाणे प्रसिद्ध ठिकाणे आपल्याला पाहायला मिळतात :-

शिवनेरी किल्ल्यावर आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थान पाहायला मिळते. किल्ल्याच्या दक्षिण टोकाला छत्रपती शिवाजी महाराज व राजमाता जिजाऊ यांचा एक पुतळा आहे. किल्ल्यावर शिवाई देवीचे मंदिर आहे. गडाच्या उत्तर दिशेला बदामी तलाव आहे. हा तलाव बदामी आकाराचा असल्यामुळे याचे नाव बदामी तलाव असे आहे. गडावर विविध प्रकारच्या बौद्ध लेण्याही आहेत. गडावर गंगा व यमुना नावाच्या दोन पाण्याच्या टाक्या आहेत. मुघल काळातील एक मशिद आपल्याला गडावर पाहायला मिळते.

तानाजी मालुसरे उद्यान आपल्याला गडावर पाहायला मिळते जे गडाच्या डाव्या बाजूला आहे. गडाचे सर्व दरवाजे पार केल्यानंतर आपल्याला अंबरखाना लागतो, या अंबरखान्याचा वापर पूर्वी धान्य ठेवण्यासाठी केला जायचा. बदामी तलावाच्या पुढे गेल्यानंतर कडेलोट टोक आहे. या कडेलोट टोकाची उंची जवळजवळ 1500 फूट आहे, पूर्वी गुन्हेगारांना शिक्षा म्हणून कडेलोट केला जायचा, या कडेलोट टोकावरून गुन्हेगारांचा कडेलोट करायचे. शिवनेरी किल्ल्यावर ही प्रसिद्ध ठिकाणे आपल्याला पाहायला मिळतात.

शिवनेरी किल्ल्याची ही अतिशय संक्षिप्त माहिती आम्ही तुम्हाला या लेखांमधून दिलेली आहे. आशा आहे की, तुम्हाला ही माहिती आवडली असेल.

शिवनेरी किल्ला कोणी बांधला?

शिवनेरी किल्ला हा मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थान आहे. हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराज यांचे वडील शहाजी राजे यांनी आपला मुलगा आणि पत्नी जिजामाता यांना आक्रमक आणि नैसर्गिक आपत्तींपासून वाचवण्यासाठी बांधला होता.

शिवनेरी किल्ला कधी बांधला गेला?

मराठा राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थान म्हणून प्रसिद्ध असलेला, पुणे जिल्ह्याच्या उत्तरेकडील जुन्नरजवळ असलेला हा १७ व्या शतकातील किल्ला, महाराष्ट्राच्या इतिहासात महत्त्वाचे स्थान आहे.


Comments

Popular posts from this blog

माझा आवडता संत - संत ज्ञानेश्वर ( Maza Avadta Sant Essay in Marathi )

महिलांसाठी मराठी उखाणे | Marathi Ukhane For Female